• Unmesh Bagwe...

    Unmesh Bagwe...

    Mechanical Engineer by profession (from VJTI, Mumbai-1988 batch)... Project Management Expert (ex-PMP from Project Management Institute, USA)... ex-L&T (Resigned when Manager, Heavy Engineering Division-HED)... Socio-political Activist associated with Progressive Movement in Maharashtra... Read More
  • Social Movement

    Social Movement

    Active Association with Maharashtra Social Change Movement (सामाजिक परिवर्तनाची पुरोगामी चळवळ)... Rashtra Seva Dal, Adhashradhaa Nirmulan Samiti, Samata Andolan, Shoshit Jan Andolan, Sane Guruji Rashtriya Smarak, Sugava Mishra Vivah Mandal, Jagtikikaran Virodhi Kruti Samiti etc etc... Read More
  • City Activism

    City Activism

    Thane City where I stay, the most corrupt political background, I spearhead the efforts to bring active activists, alert citizen & progressive organisations under one banner.. we initiated joint efforts under the banner of Thane Matadata Jagran Abhiyan Read More
  • ZBNF-Mumbai

    ZBNF-Mumbai

    कृषी ऋषी पद्मश्री सुभाष पालेकर गुरुजी यांच्या झिरो बजेट अध्यात्मिक नैसर्गिक शेतीचा (ZBNF) प्रचार व प्रसार मुंबईत व्हावा आणि शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क साधून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळे, भाज्या व धान्य यांची विक्री होऊन शेतकऱ्यांचा लाभ आणि शहरी माणसाची जीवनशैली  नैसर्गिक व्हावी याचा प्रयत्न मुंबईत करण्यासाठी सहायता गट...   Read More
  • 1
  • 2
  • 3
  • 4

My Political Party स्वराज इंडिया

The new party aims to attain Swaraj for and within our country, our society, our globe and our selves. For us Swaraj is rule of the self & rule over one's self, Freedom from all forms of dominance & Freedom for Self-Realization at every level of human life

Swaraj India Website

  • संघटना
  • आगामी कार्यक्रम
  • बातम्या
 
image

पर्यायी राजकारणासाठी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सुरु केलेला राजकीय पक्ष.

अध्यक्ष - योगेंद्र यादव
 
image

पद्मश्री कृषी ऋषी सुभाष पालेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त अध्यात्मिक नैसर्गिक शेती.

ZBNF-मुंबई सहायता गट 
 
image

ठाण्यातील नागरी समस्यांवर संवाद, संघर्ष, संघटन करणारा नागरिकांचा पक्ष.

ठाणे
 
 

सुस्वागतम, Welcome

 ठाण्यात शिक्षण हक्क परिषद

ठाण्यामध्ये सोमवार २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्याच दिवशी शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या आणि बाजारीकरणाच्या विरुद्ध शिक्षक - पालक आणि विद्यार्थ्यांची एक परिषद शिक्षण हक्क परीसःद ठाणे मतदाता जागरण अभियान या नागरिकांच्या कृती गटाने आयोजित केली आहे, ज्याला उपस्थित राहणार आहेत - प्रसिद्ध शिक्षण तज्ञ अनिल सदगोपाल ! 

देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे उलटल्यानंतरही शिक्षण क्षेत्रात कमालीचा गोंधळ आहे, परिस्थिती गंभीर आहे. कोट्यावधी बालकांना, युवकांना समान, मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा व्यापार त्यातून नफेबाजी केली आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे विषमता, समाजातील दरी वाढत जात आहे. मग शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळाला आहे का ?

शिक्षणाच्या मुलभूत हक्काच्या विरोधातील ८६वी राज्यघटना दुरुस्ती वाजपेयी सरकारने केवळ ६ ते १४ (पहिली ते आठवी) वर्षासाठी मोफत शिक्षण अशी मुलभूत अधिकाराच्या व्याख्येत न बसणारी दुरुस्ती करीत सरकारच्या जबाबदारीपासून पळ काढला. शिक्षण विकत मिळत असल्याने गरिबांना कमी प्रतीचे आणि मध्यमवर्गीय व श्रीमंतांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारी चुकीची शिक्षणपद्धती त्यामुळे फोफावली. शिक्षण सम्राट जन्माला आले आणि शिक्षण हा चोरांचा धंदा बनला. शिक्षण हि विकण्याची वस्तू नाही असे आता ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे. खाजगी शाळा व खाजगी महाविद्यालये मधील भ्रष्टाचाराला संरक्षण असल्याने शिक्षणाचे संपूर्ण बाजारीकरण झाले आहे.      

कायद्याची शून्य अंमलबजावणी हा RTE कायदा फक्त सरकारी व अनुदानित खाजगी शाळांनाच लागू आहे पण सरकारी शाळेत देखील या मोडक्या-तोडक्या कायद्याची अंमलबजावणी आज होत नाही. २५ टक्के गरिबांच्या मुलांना प्रवेश देण्याचे बंधन कोणतीही शाळा पाळत नाही. ठाण्यात देखील महानगरपालिका गेली सात वर्षे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांकडून सक्तीची फी वसुली करीत आहे, त्याची रीतसर तक्रार केल्यावर शासनाने महापालिकेच्या चौकशीचे आदेश काढले,  पालिकेने शिक्षण शुल्क या वर्षीपासून बंद केले. खाजगी शाळा वेगवेगळ्या नावाखाली भरमसाठ फी घेत आहेत, शाळांच्या या लुटमारीवर कोणाचेही नियंत्रण नाही आणि प्रत्येक शहरात अशा फी-वाढीबद्दल पालक आंदोलन करीत आहेत पण शासन या लुटीची दखल घ्यायला तयार नाही.     

शिक्षणाचा दर्जा शिक्षणामुळे समाज घडतो, समाजाची प्रगती होते पण सरकार शिक्षण-क्षेत्राकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शिक्षकांना सन्मान देण्याऐवजी शिक्षण-सेवक म्हणून त्यांना राबवून घेतले जात आहे, सरकारी शिक्षक शिक्षण देण्याऐवजी सरकारी योजनावर काम करीत आहेत, मातृभाषेतून शिक्षण हि जगात सर्वत्र पाळली जाणारी शिक्षणप्रणाली असताना देशातील भाषिक शाळा, सरकारी शाळा बंद होत आहेत, शिक्षक-भरती, गणवेश, मध्यान्ह आहार यात भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि शिक्षणाचा दर्जा पार ढासळला आहे. व्यवसाय शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे आणि शाळा-कॉलेजमधून बेकारांचे तांडे निर्माण होत आहेत.

 

सरकारी खर्चाने सर्वांना समान, मोफत व दर्जेदार शिक्षण ह्या हक्कासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हि लढाई

परिषद विनामुल्य आहे, सर्वांसाठी खुली आहे, ठाण्यातील शिक्षणाच्या प्रश्नावर नागरिकांचे संघटन व्हावे याची सुरुवात आहे

 शिक्षक-पालक-विद्यार्थी एकत्र आले तर परिस्थिती बदलते असा अनुभव आहे. शिक्षक व पालकांनी यासाठी जागल्याची भूमिका घ्यायला हवी. त्यासाठी ठाणे शहरात सुरुवात आम्ही करीत आहोत.

शिक्षण-हक्क परिषद : शिक्षक–पालक–विद्यार्थ्यांचा एल्गार

सोमवार दि. २ ऑक्टोबर – संध्याकाळी ४ ते ६

सरस्वती क्रीडा-संकुल, मल्हार सिनेमासमोर,नौपाडा,ठाणे

माझे आदर्श / मार्गदर्शक

Vision & Mission

या देशातील सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी मी कटिबद्ध आहे. "भारत माझा देश आहे, सारे भारतीय ..." ही शाळेत शिकलेली प्रतिज्ञा अंमलात आणणे माझे कर्तव्य आहे