My Socio-Political Agenda … माझे राजकीय-सामाजिक कार्याचे विषय
शेतकऱ्यांसाठी
Fight for Justice
भूसंपादन बाधितांची लढाई
देशाच्या विकासासाठी जमीन देऊनही योग्य मोबदला मिळत नाही, सरकारच फसविते, न्यायालयात न्याय मिळत नाही… अशा केसेससाठी भूसंपादन, आरक्षण बाधित जमीनधारक असोसिएशन
ठाण्यासाठी
Civic Movement for Reforms
ठाणे मतदाता जागरण अभियान
नागरिक शक्तीचे राजकारण
शहरीकरणाच्या प्रचंड वेगामुळे शहरे अधिकाधिक बकाल व नागरी समस्या गंभीर होत आहेत, तर नगरपालिकेत आहे अधिकारी, कंत्राटदार आणि नगरसेवकांची भ्रष्ट युती. गरज आहे नागरी चळवळ सक्षम, मजबूत व धारदार करण्याची
भविष्यासाठी
ZBNF Mumbai Support Group
सुभाष पाळेकर : नैसर्गिक शेती तंत्र
मुंबई-ठाण्यात विषमुक्त अन्न-धान्य, भाज्या-फळभाज्या, फळे मिळविण्यासाठी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ZBNF (आता SPNF) म्हणजे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीच्या पद्धतीकडे वळावे, असा माझा प्रयत्न, का ?
सामाजिक संस्थांसाठी मोफत संकेत-स्थळ
संकेत-स्थळ बनविणे हा माझा छंद आहे… एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना मी मोफत संकेत-स्थळ बनवून त्याचे प्रशिक्षण ही देतो… … Most of these sites are free of cost (including content, design & development, domain-cost & hosting fees)
आपल्याला किंवा आपल्या संस्थेला असे संकेत-स्थळ बनवून हवे असेल तर माझ्याशी संपर्क साधा …. Contact Me
माझी भूमिका व स्वप्न
पूर्वीचे अंडर-वर्ल्ड: दारू-गांजा, मटका-जुगार, स्मगलिंग, खून-दरोडे यांचे एक संघटीत विश्व… आज खुलेआम लुटणारे (नगरसेवक- आमदार- खासदार, ठेकेदार- कंत्राटदार, मंत्री, अधिकारी) अधिक संघटीत विश्व म्हणजे राजकारण
हे राजकारण स्वच्छ व्हावे, हि माझी भूमिका व स्वप्न, Read More
My Vision & Mission
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.. हि शाळेत असताना वाचलेली प्रतिज्ञा… My Vision is based on this
आता विश्वात्मके देवे … जो जो वांछील तो ते लाहो, प्राणिजात … संत ज्ञानेश्वरांचे पसायदान.. This is my Mission
Click to read my Vision&Mission
मी, उन्मेष बागवे
महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी, समाजपरीवर्तनाच्या चळवळीतील एक शिलेदार… राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास..
The Organisations which I was associated with…
समता विचार प्रसारक संस्था, ठाणे (माजी सचिव)
गरिबांच्या शिक्षणाचा लढा, एकलव्य गौरव कार्यक्रम, तरुणांसाठी समता संस्कार शिबीर हे नियमित उपक्रम व वर्षातून एकदा डॉ राम मनोहर लोहिया व्याख्यानमालेचे आयोजन – १९९५ ते २००६ या काळात ठाण्यात भरीव सक्रीय योगदान
सुगावा मिश्र विवाह मंडळ (आंतरजातीय/ आंतरधर्मीय विवाह)
आधी सुगावा (अप्पा रेडीज या साम्यकुल संस्थेच्या संस्थापकांनी सुरु केलेले विवाह मंडळ) या नावाने, नंतर प्रतिबिंब या नावाने आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह याला चालना, प्रोत्साहन देणारी संस्था.. २०१० पर्यंत संकेत-स्थळाच्या माध्यमातून किमान 50 विवाह
मानव अधिकार संवर्धन समिती, नाशिक (माजी कार्याध्यक्ष)
नाशिकमधील तरुणांच्या पुढाकाराने चार दत्तक आदिवासी गावात शिक्षण, शेती व रोजगार विषयावर कार्यरत संस्था… कार्याध्यक्ष म्हणून संस्थेला उभारी देण्यात हातभार लावला, २०१४ ते २०१८
My Blog
शिक्षणाची भिक नको – हक्क हवा
हुकुमशाही आयुक्तांचा अभिनव निषेध
ठाण्यातील पर्यावरण विनाश
माझे ठाणे – विकासाचा भयाण चेहरा
Handle UnmeshBagwe
I thank
my parents
my teachers
friends & family
for what I am today…